Cheese Garlic Paratha: बनवा चीज गार्लिक पराठा! सगळेच खातील आवडीने, नोट करा रेसिपी

Easy Recipe: हा पराठा बनवायला फारच सोपा आहे. चला याची रेसिपी जाणून घ्या.
Freepik
Freepik

पिझ्झा, बर्गर हे असे काही जंक फूड आहेत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. पण हे अजिबात चांगले नाही. अशावेळी काहीतरी टेस्टी आणि हेल्दी हवं असते. तर अशावेळी तुम्ही चीज गार्लिक पराठा बनवू शकता. याची चव पिझ्झा पेक्षा खूप चांगली आहे. चला रेसिपी जाणून घेऊयात....

लागणारे साहित्य

२ कप पीठ , १ चमचा मीठ, १/२ चमचे ड्राय यीस्ट, १/२ कप कोमट पाणी, १/४ कप तूप किंवा तेल

फिलिंगसाठी साहित्य

१ पॅकेट चीज, १/२ टीस्पून ओरेगॅनो, आणि १/२ टीस्पून चिली फ्लेक्स, लसूण, चिरलेला, १ टेबलस्पून चिरलेली ताजी कोथिंबीर (पर्यायी)

जाणून घ्या कृती

- सर्व प्रथम पीठ मळून घ्या. पीठ मळताना त्यात १ चमचा मीठ आणि १/२ चमचे ड्राय यीस्ट घाला. कोमट पाण्याने पीठ मळून घ्या, यामुळे पराठा मऊ होईल. पीठ मळून झाल्यावर त्यावर तूप लावून १० मिनिटे असेच ठेवा.

- पिठाचा गोळा घ्या आणि हलका रोल करा. आता त्यात अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चीज घालून पुन्हा पीठ बनवा आणि पराठा पुन्हा हलकी लाटून घ्या. आता पराठ्यावर चिरलेली कोथिंबीर, किसलेला लसूण आणि थोडा ओरेगॅनो घाला. आता पराठा गोल आकारात लाटून घ्या.

- आता गॅस चालू करा आणि पॅन ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यावर पराठा टाका. पराठा दोन्ही बाजूंनी नीट शिजवून घ्या. दोन्ही बाजूंनी चांगले तेल लावा तुमचा गरम चीज गार्लिक पराठा तयार आहे. सॉस बरोबर खा.

logo
marathi.freepressjournal.in