ताण आणि थकवा दूर करण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा

आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये स्ट्रेस आणि थकवा बऱ्याच वेळेला खूप होतो. आणि त्यामुळे ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते आणि मग स्वतःला सर्वांनापासून दूर ठेवते
ताण आणि थकवा दूर करण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा

आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये स्ट्रेस आणि थकवा बऱ्याच वेळेला खूप होतो. आणि त्यामुळे ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते आणि मग स्वतःला सर्वांनापासून दूर ठेवते, या जगात सगळ्या लोकांना स्ट्रेस आणि थकवा होतो, त्याच फक्त एकमेव कारण म्हणजे बदलेली लाइफस्टाइल, तसेच दुसऱ्या गोष्टी देखील याला कारणीभूत असतात. म्हणजेच कोणत्या तरी एका गोष्टीला घेऊन आपण खूप विचार करतो. त्यामुळे त्याचा आपल्या हॉर्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो. खालील काही गोष्टी आहेत, ज्या नियमित करा आणि थकवा घालावा.

दीर्घ श्वास घ्या आणि कसला विचार नका करू-

तुम्ही जर दिर्घ श्वास घेतला आणि स्ट्रेचिंग केले तर कोणत्याच प्रकारचा स्ट्रेस आणि थकवा आपल्यामध्ये राहत नाही. तसेच कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. जास्त विचार केल्यानेही कोणत्या पण व्यक्तीमध्ये ताण तणावात जाणवतो . त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि दुसऱ्याविषयी बोलताना व्यवहार देखील बदलतो.

नवनवीन लोकांना जाऊन भेटा -

खूप वेळा आपण असे करतो की , ताण तणावात जी लोक असतात ती स्वतःला एकटे ठेवतात. आणि स्वतःला दुसऱ्यांपासून लांब ठेवतात. ही गोष्ट आपण करायला अजिबात नको. तुम्हाला जर ताणतणावापासून सुटका हवी असेल तर दुसऱ्या लोकांना भेटा त्यांच्यासोबत वेळ घालवा. असे केल्याने मन शांत होईल आणि चांगली ऊर्जा कायम राहिल.

गाणे ऐका-

जेव्हा तुम्हाला असे वाटेल की मला कोणत्या तरी गोष्टीचा ताण आला आहे किंवा थकवा जाणवत असेल, तेव्हा तुमच्या आवडीचे गाणे डोळे बंद करून ऐका, आवडीचे गाणे म्हणजे, पॉप आणि रॉक नाही , तर शांत आणि मनोरंजन, जे तुमच्या मनाला शांती देईल.

मसाज करा-

मसाज केल्यामुळे ही तणाव कमी होतो. त्यासाठी डोक्याच्या मसाजपासून बॉडीची मसाज पण चालू शकतो. मुख्य म्हणजे मसाज एक्सपर्ट कडूनच मसाज करा. या सोबत तुम्ही पौष्टीक आहार देखील सुरु ठेवा त्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in