दरवेळेस टिफिनमध्ये तेच खाऊन मुलांना कंटाळ आलाय? मग 'हे' पदार्थ नक्की करून पाहा!

तुमच्या मुलांना पौष्टिक आणि चवदार पदार्थ खायला घालावेत असे प्रत्येक आईला वाटत असते. त्यामुळे दरवेळेस टिफिनमध्ये चांगले पदार्थ देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो.
दरवेळेस टिफिनमध्ये तेच खाऊन मुलांना कंटाळ आलाय? मग 'हे' पदार्थ नक्की करून पाहा!

तुमच्या मुलांना पौष्टिक आणि चवदार पदार्थ खायला घालावेत असे प्रत्येक आईला वाटत असते. त्यामुळे दरवेळेस टिफिनमध्ये चांगले पदार्थ देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. ते पदार्थ चटपटीत तर असावेतच शिवाय पौष्टिकही असावेत असा मूळ हेतू असतो.

१. उकडलेले काळे वाटाणे, उकडलेल्या बटाट्याचे थोडे चौकोनी तुकडे, टोमॅटोच्या चकत्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस आणि चाट मसाला. हे सगळे पदार्थ एकत्र करून त्याची छान चाट बनवावी. ब्रेकफास्टसाठीही हा उत्तम पदार्थ आहे. यात भरपूर प्रोटीन्स आणि काबोर्हायड्रेट्स असतात.

. पराठा बनवताना त्यात वेगवेगळी पीठं वापरावीत. म्हणजे थोडं गव्हाचं, थोडं चण्याचं, ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ पराठ्यात वापरावं. हे पराठे आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यात थोडी बारीक चिरलेली मेथी, चवीनुसार मीठ आणि दही पीठ मळतानाच घालावं. पराठ्याचा आकार लहानच ठेवावा.

३. खूप घाई झाली असेल तर सॉल्टी बिस्किट्सवर चीझचे तुकडे ठेऊन ते टिफिनमध्ये द्यावं.

. डब्यात सॅण्डविच द्यायचं असेल तर ब्रेडच्या कडा कापू नका. या सॅण्डविचमध्ये उकडलेले बटाटे, किसलेलं गाजर, काकडी आणि थोडं दही हे पदार्थ वापरावेत. चवीनुसार मीठ आणि काळी मिरीपूड घालावी.

. पोहे हासुद्धा डब्यात देण्यासाठीचा चांगला पदार्थ आहे. त्यात कधीकधी गाजर, मटारही घालावेत. याने पोहे अधिक पौष्टिक तर बनतीलच शिवाय ते आकर्षकही दिसतील.

. इडलीमध्ये तर बरेच प्रयोग करता येतात. इडलीच्या तयार मिश्रणात मटार, गाजर, काजू, चणाडाळ घालावी. अशा मिक्स इडल्या खूप चवदार लागतात. त्या अधिक आकर्षक दिसाव्यात म्हणून त्यांना भाज्यांचा वापर करून डोळे आणि नाकही काढावं. मुलं जेव्हा डबा उघडतील तेव्हा या हसऱ्या इडल्या पाहून ते चकितच होतील.

. मोड आलेल्या मुगाचं सॅलडही त्यांना डब्यात द्यावं. या सॅलडमध्ये मूग, टोमॅटो, काकडी, बीट आणि डाळिंबाचे थोडे दाणे घालावेत.

हे पदार्थं बनवायला खूप सोपे आहेत आणि पौष्टिक पण आहेत. त्यामुळे मुलांसाठी आता काही तरी नवीन आणि खास बनवा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in