भारतीय पर्यटक २०२४ ला व्हिसाशिवाय ‘या’ सुंदर देशांना जाणून देऊ शकतात भेट; जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला पण कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायच आहे. आपल्या खास लोकांसोबत कुठे तरी जाण्यामध्ये एक वेगळे सुख असते.
भारतीय पर्यटक २०२४ ला व्हिसाशिवाय ‘या’ सुंदर देशांना जाणून देऊ शकतात भेट; जाणून घ्या सविस्तर
PM

तुम्हालापण कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायच आहे. आपल्या खास लोकांसोबत कुठे तरी जाण्यामध्ये एक वेगळे सुख असते. यातच उन्हाळा ऋतू आला की, प्रत्येकाच्या मनात विविध ठिकाणी फिरायला जाण्याच्या योजना आखण्यास सुरुवात होते. पण, नक्की कुठे फिरायला जायचं हे मात्र काही ठरत नाही. तर तुम्हाला परदेशात फिरायला जायला आवडेल का? हो. तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेकदा फिरायला जाताना व्हिसा अर्ज प्रक्रिया अडथळा ठरते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण भारतीय पर्यटकांना पासपोर्टसह काही देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

पुढीलप्रमाणे या सुंदर देशांना तुम्ही व्हिसाशिवाय भेट देऊ शकता-

थायलंड – थायलंडमध्ये आकर्षक समुद्रकिनारे, दोलायमान शहरे आणि प्राचीन मंदिरे आहेत. फुकेतच्या नीलमणी पाण्यापासून ते बँकॉकच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत थायलंडमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. तर थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांना १० मे २०२४ पर्यंत ३० दिवसांसाठी व्हिसा मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

PM

इंडोनेशिया – इंडोनेशिया म्हटलं की डोळ्यासमोर अनेक नयनरम्य बेटांचं बाली येतं. पण, त्याहीपलीकडे इंडोनेशियाला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे आणि तो त्यांनी चांगल्या प्रकारे जोपासलादेखील आहे. तुम्ही बालीमधील जंगलांमधून ट्रेक करा किंवा प्राचीन मंदिरे एक्सप्लोर करा. इंडोनेशिया हे निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि समुद्रकिनाऱ्यांवर प्रेम करणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम आहे.

PM

मलेशिया – संस्कृती आणि पाककृतींचा अनुभव तुम्हाला मलेशियामध्ये घेता येईल. येथील रस्ते, प्रतिष्ठित पेट्रोनास टॉवर्स पाहा किंवा नॅशनल पार्कमधून ट्रेक करा. मलेशिया हा देश पर्यटकांसाठी बजेटफ्रेंडली पर्याय आहे.

PM

केनिया – अविश्वसनीय वन्यजीव, आश्चर्यकारक लँडस्केप आणि दोलायमान संस्कृती असणाऱ्या या देशात तुम्हाला व्हिसा मुक्त फिरण्याची संधी आहे .

इराण – पर्शियाचे समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती, गजबलेले मार्केट, सुंदर मशिदी यांचा आनंद इराणमध्ये तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला १५ दिवसांपर्यंत व्हिसा मुक्त फिरण्याची संधी मिळणार आहे.

श्रीलंका – श्रीलंकेत तुम्हाला ३० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त ( ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे) प्रवास करण्याची संधी मिळते आहे. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकणार आहात.

PM

मॉरिशस – हिंद महासागरातील हे नंदनवन बेट त्याच्या आलिशान रिसॉर्ट्स, प्राचीन समुद्रकिनारे आणि वैविध्यपूर्ण सागरी जीवनासाठी ओळखले जाते. येथील स्वच्छ पाण्यात स्नॉर्कलिंग करा, हिरव्यागार जंगलात फिरा किंवा कॉकटेल हातात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर आराम करा. तर मॉरिशस देश तुम्हाला ९० दिवसांपर्यंत व्हिसा मुक्त प्रवास करण्याची ऑफर देतो आहे ; ज्यामुळे उन्हाळ्यात निवांत सुट्टी घालवण्याचा हा एक योग्य पर्याय ठरतो.

PM

तर या देशांमध्ये भारतीय पर्यटक व्हिसा फ्री प्रवास करू शकणार आहेत.

पुढीलप्रमाणे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा -

व्हिसाची आवश्यकता (रिक्वायरमेंट्स) कधीही बदलू शकतात. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी नेहमी नवीन (अपडेट ) माहिती तपासून घ्या.

एखाद्या देशामध्ये तुम्ही जितके दिवस राहणार आहात ती तारीख उलटून गेल्यानंतर त्या देशात तुम्हाला वैध पासपोर्टची गरज लागू शकते, ही बाब लक्षात ठेवा.

तुमच्याकडे प्रवास विमा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत ना याची खात्री करा; ज्यात तुमच्या रिटर्न तिकिटांचादेखील समावेश असावा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in