तुम्हाला पण लिंबू पाणी आवडते? जाणून घ्या फायदे आणि तोटे; वाचा सविस्तर

अगदी लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्वांनाच लिंबू पाणी खूप आवडते. लिंबूसह पाणी हे एक पेय आहे ज्यामध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
तुम्हाला पण लिंबू पाणी आवडते? जाणून घ्या फायदे आणि तोटे; वाचा सविस्तर
PM

आता बघता बघता मे महिना जवळ आला आहे. मे महिन्यांत आपल्या सर्वांना उन्हाचा सामना करावा करतो . त्यासाठी आपण सारखे लिंबू पाणी पीत असतो. अगदी लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्वांनाच लिंबू पाणी खूप आवडते. लिंबूसह पाणी हे एक पेय आहे ज्यामध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र, तितकेच त्याचे तोटेही आहेत.चला आज जाणून घेऊयात सविस्तर.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे-

1. लिंबू विटमिन सी चे चांगले स्रोत आहे. या मध्ये इतर व्हिटॅमिन्स जसे की थायमिन, रायबोफ्लॅविन, नियासिन, व्हिटॅमिन बी -6 फोलेट आणि व्हिटॅमिन ई थोड्या प्रमाणात आढळतात. या मुळे घसा खराब होणे,बद्धकोष्ठता किडनी आणि हिरड्यांच्या समस्येपासून आराम देतो. रक्तदाब आणि तणाव देखील कमी करतो. त्वचा निरोगी बनविण्यासह लिव्हरसाठी देखील चांगले आहे.

2. पचन क्रिया संतुलित करण्यात आणि कर्करोगापासून बचाव करण्यासाठी हे मदत करते. या मध्ये अनेक प्रकारचे खनिजे जसे मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जिंक आढळते.

3. मूतखडा मध्ये देखील हे आरामदायक आहे. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर रिहायड्रेट होण्यात मदत मिळते. हे युरीन पातळ करण्यात मदत करतो.

4. मधुमेह असल्यास किंवा वजन कमी करायचे असल्यास साखरेच्या पातळीला न वाढवता शरीराला रिहायड्रेट करून ऊर्जा देतो.

5. घसा खराब असल्यास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने घसा बरा होतो.

6. वजन कमी करण्यासाठी दररोज मधासह कोमट पाणी प्यायल्याने जास्तीचे वजन कमी करू शकतो.

लिंबू पाण्याचे तोटे-

पोट खराब होऊ शकते : लिंबू पोटासाठी खूप फायदेशीर असले तरी पाण्यात जास्त पिळून खाल्ल्याने पोटात गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही समस्या लिंबासारख्या आम्लयुक्त अन्नापासून सुरू होतात. यामुळे छातीत जळजळ, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

त्वचेसाठी हानिकारक : जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थमध्ये 2007 च्या अभ्यासात, संशोधकांनी 21 वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधील 76 लिंबूंचे नमुने तपासले. यापैकी अनेक लिंबांच्या सालींवर असे अनेक सूक्ष्मजीव आढळून आले ज्यामुळे रोग होऊ शकतात. हे टाळण्यासाठी पाण्यात लिंबाची साल टाकण्याऐवजी त्याचे फक्त थेंब पाण्यात टाका.

जळजळ वाढवू शकते : लिंबू पाणी लहान जखमांमध्ये वेदना आणि जळजळ वाढवू शकते. किरकोळ जखमा एक किंवा दोन आठवड्यांत बऱ्या होतात. परंतु, अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मते, जास्त लिंबू पाणी प्यायल्याने कॅन्कर फोड वाढू शकतात. जास्त प्रमाणात लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने जखमा बऱ्या होण्यास विलंब होतो.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in