हिवाळ्यात तुमचे पण ओठ फाटतात का? तर आता काळजी सोडा, फॉलो करा 'या' ३ टिप्स

हिवाळ्यात हवेत ओलावा कमी असल्यामुळे त्वचेत कोरडेपणा येणे सामान्य आहे. या काळात बहुतेक लोकांना फाटलेल्या ओठांचा त्रास होतो.
हिवाळ्यात तुमचे पण ओठ फाटतात का?  तर आता काळजी सोडा, फॉलो करा 'या' ३ टिप्स
PM

हिवाळ्यात हवेत ओलावा कमी असल्यामुळे त्वचेत कोरडेपणा येणे सामान्य आहे. या काळात बहुतेक लोकांना फाटलेल्या ओठांचा त्रास होतो. काही लोकांचे ओठ फाटल्यामुळे त्यामुळे रक्त देखील येते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. येथे तीन अतिशय सोपे उपाय आहेत.

मध

मधाची कंसिसटंसी घट्ट व चिकट असते. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म अनेक समस्यांपासून आराम देतात. तसेच, ते जखमा बरे करण्याच्या गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे ओठांना मॉइश्चरायझ करताना फाटलेले ओठ बरे करू शकतात. ते लावण्यासाठी बोटावर थोडेसे मध घ्या आणि ते ओठांवर लावा. ते तसेच राहू द्या. तुम्ही दिवसभर सुद्धा तुमच्या कोरड्या ओठांवर मध ठेवू शकता.

PM

गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध

मूठभर गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या एक कप कच्च्या दुधात काही तास भिजवा. नंतर भिजवलेल्या पाकळ्या बारीक करा आणि ही पेस्ट कोरड्या ओठांवर दिवसातून २ ते ३ वेळा लावा. रात्री झोपण्यापूर्वी ते लावणे उत्तम. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन ई असते जे ओठांच्या त्वचेचे पोषण करते. त्याचप्रमाणे दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे डेड स्किन काढून टाकते आणि एक्सफोलिएशन करण्यास मदत करते.

PM

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल मध्ये अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत जे आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. म्हणूनच डेंटिस्ट कोरडे ओठ, हिरड्यांच्या रोगांवर उपचार करण्यासाठी ते लावण्याचा सल्ला देतात. एलोवेरा जेलमधील एन्झाइम्समध्ये सौम्य एक्सफोलिएटिंग एजंट असतात. हे डेड स्किन काढून टाकण्यास उपयुक्त आहे. ते लावण्यासाठी तुम्ही फ्रेश एलोवेराचा म्हणजेच कोरफडचा वापर करु शकता. कोरफडच्या पानातून गर काढा. नंतर ते ओठांवर लावून चोळा. ओठांना हायड्रेट करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल मर्यादित प्रमाणात वापरावे. कारण त्यात पीलिंग गुणधर्म आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in