प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवा घरच्या घरी तिरंग्याचे 'हे' स्पेशल पदार्थ; जाणून घ्या सविस्तर

प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त करतात. तसेच, अनेक महिला या दिनाच्या निमित्ताने आपलं कौशल्य सादर करण्यासाठी तिरंगी पदार्थ बनवतात.
प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवा घरच्या घरी तिरंग्याचे 'हे' स्पेशल पदार्थ; जाणून घ्या सविस्तर

भारताच्या प्रजासत्ताक दिन हा आज आहे. हा दिन (26 जानेवारी) रोजी साजरा केला जातो. या दिवशी झेंडावंदन केले जाते. अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त करतात. तसेच, अनेक महिला या दिनाच्या निमित्ताने आपलं कौशल्य सादर करण्यासाठी तिरंगी पदार्थ बनवतात. तर, या प्रजासत्ताकदिनीही तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल, तर या ठिकाणी आम्ही काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत त्याचा तुम्ही वापर करून तुम्ही ही काही तरी बनवू शकता.

1. तिरंगी सोया चाप

शाकाहारी लोकांसाठी सोया चाप हा सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. या साध्या डिशमध्ये तिरंगी चव जोडण्यासाठी, तुम्ही त्याला तिरंगा रंग देऊ शकता. यासाठी तुम्हाला तिरंग्याच्या तीनही रंगांचे मॅरीनेड तयार करावे लागेल. ऑरेंज मॅरीनेशनसाठी दही, ग्रीन मॅरीनेशनसाठी, काश्मिरी तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, मोहरीचे तेल आणि कसुरी मेथी एकत्र मिक्स करा. ऑरेंज मॅरीनेशनसाठी सारखेच घटक घ्या, फक्त हिरवा रंग मिळवण्यासाठी तुम्हाला त्यात धणे आणि पुदिन्याची पेस्ट घालावी लागेल आणि काळी मिरी पावडर देखील वापरावी लागेल. व्हाईट मॅरीनेशनसाठी दही, काजू पेस्ट, चीज, वेलची पावडर, मीठ आणि व्हाईट पेपर पावडर मिक्स करा. आता सोया चापला तुमच्या सोयीनुसार तिन्ही मॅरीनेशनमध्ये मॅरीनेट करा आणि 25 मिनिटं राहू द्या. आणि नंतर ग्रील करा.

2. तिरंगा रंगाची स्विट डिश

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी तुम्ही दुधापासून बनवलेला हा खास पदार्थ बनवू शकता. यासाठी दूध उकळून तीन ठिकाणी वेगळे ठेवावे. एका भांड्यात ऑरेंज जिलेटिन रंग, दुसऱ्यामध्ये किवी आणि तिसऱ्यामध्ये व्हॅनिला फ्लेवर मिसळा. यानंतर, मध्यम आचेवर पॅनमध्ये जाड मलई आणि साखर चांगली वितळवा. आता ही क्रीम तीन ठिकाणी वेगवेगळी ठेवा. आता वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी क्रीम मिसळा. हे सर्व मिक्स केल्यानंतर, बेसला साच्यात बनवण्यासाठी, सर्वात आधी किवीपासून तयार केलेला हिरवा बेस टाका, त्यानंतर 10 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. 10 मिनिटांनंतर, ते बाहेर काढा आणि त्यावर व्हॅनिला मिश्रण घाला. सेम प्रक्रिया संत्र्याच्या मिश्रणासह करा. आता हे सर्व एकत्र फ्रीझरमध्ये किमान 2-3 तास सेट करण्यासाठी सोडा. तीन तासांनंतर फ्रीजमधून काढून थंडगार सर्व्ह करा.

3. तिरंगी इडली

साऊथचा हा सर्वात प्रसिद्ध पदार्थ भारतातही आवडीने खाल्ल जातो. तसेच इडली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. शिवाय ती पौष्टिकही असते. इडली बनविण्यासाठी तुम्ही ती स्टीमरमध्ये 10 ते 12 मिनिटं किंवा शिजेपर्यंत वाफवून घ्या. त्यानंतर तयार झाल्यावर बाहेर काढून नारळाची चटणी आणि सांबार सोबत सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in