'या' ठिकाणी कधीच ठेवू नका मेकअपचे साहित्य; चेहऱ्यावर होईल दुष्परिणाम

प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची खूप हौस असते. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे स्किनकेयर वापरत असतात पण हे स्किनकेयर नक्की कुठे ठेवावीत हे अनेकांना माहिती नसते.
'या' ठिकाणी कधीच ठेवू नका मेकअपचे साहित्य; चेहऱ्यावर होईल दुष्परिणाम
PM

प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची खूप हौस असते. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे स्किनकेयर वापरत असतात पण हे स्किनकेयर नक्की कुठे ठेवावीत हे अनेकांना माहिती नसते. बहुतांश जण हे स्किनकेयर प्रॉडक्टस बाथरूममध्ये ठेवतात. तुम्हाला देखील ही सवय असेल तर ती लगेच बदला. मेकअप प्रॉडक्ट्स कधीही बाथरुममध्ये ठेवू नयेत. तेथील गरम आणि दमट वातावरणात तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये वाढू शकणारे बॅक्टेरिया मोल्ड आणि बुरशी ओलसर वातावरणात वाढतात. त्याचा त्वचेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

स्कीन प्रॉडक्ट बाथरुममध्ये ठेवले तर उष्णता आणि आर्द्रतेच्या सतत संपर्कामुळे त्यांचे अर्धे शेल्फ लाईफ कमी होऊ शकते. बाथरूममध्ये नेहमी ओलावा असतो. म्हणूनच त्वचेवर लावण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये जिवाणू वाढू शकतात. गरम शॉवर घेतल्यानंतर तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ऑक्सिडाइझ होऊ शकतात आणि उष्णतेमुळे ते खराब होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणारी सीरम, नाईट क्रीम, फेस मास्क आणि डोळ्याच्या क्रीम नेहमी फ्रिजमध्ये ठेवावेत. या व्यतिरिक्त, मॉइस्चरायझर्स, लोशन आणि ओठ बाम बंद हे प्रॉडक्टस केबिनमध्ये ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.

‘हे’ प्रॉडक्ट फ्रिजमध्ये ठेवू नका-

सर्व ब्युटी प्रॉडक्ट फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. विशेषत: काही प्रॉडक्ट फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नका.

लाइनर- लाइनर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण ते पटकन कोरडे होईल. लाइनर आणि मस्करा हे प्रोडक्ट्स खोलीच्या तपमानावर ठेवावेत.

नेलपेंट- फ्रिजमध्ये नेल पॉलिश ठेवल्यामुळे ती सुकते आणि पटकन खराब होते.

नेल पॉलिश- नेल पॉलिश जास्त काळ टिकवण्यासाठी ते फ्रिजमध्ये कधी ही ठेवू नका.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in