Rose Day 2024 : 'रोज डे' ला पार्टनरला द्या गुलाबापासून तयार केलेले 'हे' चविष्ट पदार्थ! जाणून घ्या रेसिपी!

गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. हा दिवस, म्हणजेच रोज डे दरवर्षी आज (7 फेब्रुवारी) रोजी साजरा केला जातो
Rose Day 2024 : 'रोज डे' ला पार्टनरला द्या गुलाबापासून तयार केलेले 'हे' चविष्ट पदार्थ! जाणून घ्या रेसिपी!
PM

गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. हा दिवस, म्हणजेच रोज डे दरवर्षी आज (7 फेब्रुवारी) रोजी साजरा केला जातो. या दिवशी व्यक्ती आपल्या जोडीदाराला, प्रियकराला किंवा मैत्रिणीला गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करते. तुम्ही अनेकांना गुलाब दिले किंवा घेतले असतील. आज तुम्हाला गुलाबापासून बनवलेल्या काही रेसिपींबद्दल सांगणार आहोत. ही गोड मिठाई खाल्ल्यानंतर तुमच्या जोडीदाराचे मन प्रसन्न होईल. तर, हा रोज डे आणखी खास बनवण्यासाठी, या 5 स्वादिष्ट गुलाबापासून बनलेल्या रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

बर्फी

ही खास प्रकारची बर्फी बनवणं खूप सोपं आहे. तुम्ही ते दोन प्रकारे बनवू शकता. पहिली म्हणजे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकता आणि दुसरे म्हणजे बर्फी बनवण्यासाठी तुम्ही रोज इसेंस घालू शकता. बर्फी थोडी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात ड्रायफ्रुट्सही घालू शकता.

PM

कुकीज

तुम्ही अनेक प्रकारच्या कुकीज खाल्ल्या असतील, पण या रोज डेच्या दिवशी गुलाबापासून बनवलेल्या कुकीज ट्राय करून पाहा आणि तुमच्या प्रियकराचे मन जिंका. हे बनवणे इतर कुकीज प्रमाणे सोपे आहे. कुकीच्या बॅटरमध्ये गुलाबाच्या पाकळ्या मिसळून तुम्ही हे बनवू शकता.

PM

गुलाबाची खीर

गोड पदार्थ कोणाला आवडत नाहीत आणि खीर म्हंटल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. परफेक्ट गुलाबाची खीर बनवण्यासाठी तुम्ही शेफ अजय चोप्रा यांनी दिलेल्या रेसिपी फॉलो करू शकता. हे खायला इतके चविष्ट आहे की तुमचा पार्टनर खूश होईल.

PM

गुलाब फिरनी

तुम्हाला उत्तम गुलाब फिरनी बनवायची असेल, तर शेफ संजीव कपूर यांनी दिलेल्या रेसिपी फॉलो करा. हे बनवायलाही सोपे आहे. तुम्ही पिठात रोज इसेंस मिक्स करू शकता आणि गुलाबाची फिरणी

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in