तुमचे देखील ओठ वारंवार फुटतात?अशा प्रकारे घ्या नाजूक ओठांची काळजी!

आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जे आपल्या समस्यांना अगदी सहजगत्या सोडवतील आणि तुमच्या ओठांना मुलायम देखील बनवतील
तुमचे देखील ओठ वारंवार फुटतात?अशा प्रकारे घ्या नाजूक ओठांची काळजी!
PM

मुंबईत अचानक थंडी वाढली आहे. या हिवाळ्याच्या मोसमात कोरड्या हवामानामुळे ओठ रुक्ष होणे , अथवा ओठ फुटणे या समस्या सामान्य आहेत. बर्‍याच वेळा ही समस्या इतकी वेदनादायक होते की, ओठातून रक्त येऊ लागते. अशा परिस्थितीत आपण लिपबाम किंवा व्हॅसलीनचा वापर करुन घराबाहेर गेल्यास धूळी कणांमुळे समस्या अधिकच वाढते. या समस्येवर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जे आपल्या समस्यांना अगदी सहजगत्या सोडवतील आणि तुमच्या ओठांना मुलायम देखील बनवतील

झोपताना नाभीवर मोहरीचे तेल लावा.

रात्री झोपताना आपल्या नाभीवर म्हणजेच बेंबीवर मोहरीचे तेल लावा. यामुळे काहीच वेळात, ओठ फुटण्याची समस्या दूर होईल. तसेच, काही दिवसांतच ओठ मऊ आणि गुलाबी होतील. मोहरीच्या तेलाने असे आणखी फायदे आपल्याला दिसून येतील.

भरपूर पाणी प्या.

लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा शरीरात ओलावा नसतो तेव्हाच अशा प्रकारच्या समस्या वाढतात. लोक सहसा हिवाळ्यात कमी पाणी पितात. यामुळे त्वचा आणि ओठ कोरडे फुटू लागतात. या समस्यांपासून ओठांचा बचाव करण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसांतही भरपूर पाणी प्या.

ओठांवर दूधाची साय लावा.

रात्री झोपताना फुठलेल्या ओठांवर दूधाची साय लावून झोपा. यामुळे एका रात्रीतच आपल्याला या समस्येतून खूप आराम मिळेल. जर, आपण दररोज असे केले तर, ओठांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच, ओठ मऊ होतील. दूधाची साय अर्थात मलई ओठांच्या नाजूक त्वचेवर डीप मॉइश्चरायझर म्हणून काम करते

गुलाबची पाने आणि मध देखील प्रभावी

ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबची पाने देखील मदत करतात. गुलाबाची पाने बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपेच्या वेळी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in