दुधाचे सेवन करण्याआधी जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती दुधाचे सेवन करतात. लहान मुलांना दररोज शाळेत जाताना आणि रात्री झोपताना आपण आवर्जून एक ग्लास दूध देते.
दुधाचे सेवन करण्याआधी जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!
PM

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती दुधाचे सेवन करतात. लहान मुलांना दररोज शाळेत जाताना आणि रात्री झोपताना आपण आवर्जून एक ग्लास दूध देते. पण, अनेक मुले दुधाचे सेवन करण्यास नकार देतात. त्यांना दुधाचे सेवन करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. पण, तुम्ही तुमच्या मुलांना दूध देता खरे पण, त्यापासून कोणते फायदे होतात, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? कदाचित दुधाचे सेवन करण्याचे फायदे तुमच्या लहान मुलांना सांगितले तर मुलं दुधाचे सेवन आवडीने करतील. जाणून घेऊया दुधाचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे.

PM

दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे?

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

जाणून घ्या दुधाचे फायदे

हाडे आणि स्नायू होतात मजबूत

दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात. दूध हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा प्रकार) आणि वृद्धापकाळातील फ्रॅक्चर टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे दुधाचे नियमित सेवन करावे. याशिवाय दुधामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात जे स्नायूंसाठी फायदेशीर मानले जातात .

दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

दूध हे दातांकरता देखील लाभदायक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात. तसेच दुधाचे सेवन केल्याने दात निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज दुधाचे सेवन करा.

दुधाच्या सेवनाने वजन होते कमी

वाढते वजन कमी करण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या ३८% मुलांचे वजन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत नियंत्रित होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत आणि प्रथिने वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुधाचे सेवन केल्याने जेवण अधिक प्रमाणात जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

PM

हृदयाचे आरोग्य

दररोज दुधाचे सेवन केल्याने हृदय उत्तम राहण्यास मदत होते. दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज २०० मिली दुधाचे सेवन करतात, त्यांना स्ट्रोकचा धोका ७ टक्के कमी असतो.

PM
PM

मधुमेहासाठी फायदेशीर

दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. दुधात असलेल्या फॅटी अॅसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in