हिवाळ्यात ट्राय करा हॉट चॉकलेट, १५ मिनिटांत बनेल कॅफेस्टाईल चॉकलेट

चॉकलेट हा तसा लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांचा आवडता पदार्थ. हल्ली चहा-कॉफीचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे.
हिवाळ्यात ट्राय करा हॉट चॉकलेट, १५ मिनिटांत बनेल कॅफेस्टाईल चॉकलेट
PM

हिवाळा आला म्हटले की गुलाबी थंडीचा गारवा असतो . या काळात शरीराला ऊर्जा देणारे आणि शरीरात ऊब टिकवून ठेवणारे पदार्थ चवी खाल्ले जातात.

चॉकलेट हा तसा लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांचा आवडता पदार्थ. हल्ली चहा-कॉफीचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे. जर तुम्हालाही या काळात हॉट चॉकलेट प्यायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

बरेचदा हे हॉट चॉकलेट पिण्यासाठी आपल्याला कॅफेमध्ये जाण्याची गरज पडते पण आता कमी खर्चात घरच्या घरी कसे बनवाल हॉट चॉकलेट पाहूया.

साहित्य

किसलेले चॉकलेट - ५० ग्रॅम

फुल क्रिम दूध - २ कप

साखर - २ चमचे

व्हॅनिला इसेन्स - १/२ टीस्पून

व्हीप्ड क्रीम - २ चमचे

कृती

-प्रथम चॉकलेट किसून घ्या. एका भांड्यात घेऊन वितळवून घ्या.

-चॉकलेट चांगले मिक्स करुन वितळल्यानंतर मिक्स करुन घ्या. एका पॅनमध्ये दूध आणि साखर घेऊन गरम करुन घ्या. दूधावर मलाईची साय आल्यानंतर २ मिनिटानंतर गॅस बंद करा.

-चमचे गरम दूधात चॉकलेट घेऊन दोन्ही पदार्थ घालून मिक्स करुन घ्या. व्हिस्करच्या मदतीने फेटून घ्या.

-एका भांड्यात वितळवलेले चॉकलेट आणि व्हॅनिला इसेन्स दुधात घालून मिक्स करा.

- पुन्हा एकदा दूध गरम करुन सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in