Valentine Day 2024: व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी बेस्ट ठिकाण शोधात आहेत? मुंबई- पुण्याजवळील 'या' ठिकाणी द्या भेट, आणि सेलिब्रेट करा खास दिवस

या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता. चला जाणून घ्या कोणती आहेत ती ठिकाणे.
Valentine Day 2024: व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी बेस्ट ठिकाण शोधात आहेत? मुंबई- पुण्याजवळील 'या' ठिकाणी द्या भेट, आणि  सेलिब्रेट करा खास दिवस
PM

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. तुम्ही व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्याचा विचार करत आहात का? तर आज तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात सुद्धा जाऊन येऊ शकता आणि ते पण बजेटमध्ये कारण व्हॅलेनटाईन डेसाठी आपल्याला कधीच सुट्टी मिळत नाही. पण आपल्याला तो दिवस पार्टनरसोबत घालवावा असं वाटत असतं. काही ठिकाणं अशी आहेत जी पुण्यापासून काही अंतरावर आहेत. या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता. चला जाणून घ्या कोणती आहेत ती ठिकाणे.

अलिबाग-

अलिबाग हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे. तुम्ही बोट किंवा बाईक, कारने या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही पार्टनरला सरप्राईज देऊ शकता. अलिबागला पुण्यावरून जाण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. पुण्यापासून ३ तासांच्या अंतरावर आहे.

माळशेज घाट-

माळशेज घाटामध्ये अनेक धबधबे आहेत आणि विशेषतः पावसाळ्यात इथली हिरवाई अप्रतिम दिसते. पुण्यापासून १३० किमीवर हे ठिकाण आहे. माळशेज घाट हे हायकर्स, ट्रेकर्ससाठी हे उत्तम ठिकाणं आहे. गर्दीच्या ठिकाणापासून दूर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

लोणावळा-

पुण्यापासून लोणावळा खूप जवळ आहे. येथील धबधबे, धरणं, किल्ले नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करत असतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत या ठिकाणी गेलात तर लॉन्ग ड्राईव्ह किंवा बाईक राईडचा आनंद तुम्हाला घेता येईल.

माथेरान-

पुणे- मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. पॅनोरमा, गार्बेट, अलेक्सझांडर, हार्ट, लिटल चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पाक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, आदी पॉईंटस् पाहण्यासारखे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in