Valentine Day 2024 : कपलसाठी IRCTC ने आणले 'स्वस्त' पॅकेज, पार्टनरसोबत जा थायलंड-बँकॉक फिरायला

केवळ काही दिवसांवर आता ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. आजपासून ‘रोझ डे’ ने या व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली आहे.
Valentine Day 2024 : कपलसाठी IRCTC ने आणले 'स्वस्त' पॅकेज, पार्टनरसोबत जा थायलंड-बँकॉक फिरायला
PM

‘व्हॅलेंटाईन डे’ आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आजपासून ‘रोझ डे’ ने या व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली आहे. व्हॅलेंटाईन डे चा उत्साह तरूणांमध्ये सर्वाधिक असतो. अनेक जण हा दिवस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. तुम्ही देखील या दिवशी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.व्हॅलेंटाईन डे निमित्त IRCTC एक खास टूर पॅकेज घेऊन आला आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये थायलंडला फिरायला जाऊ शकता.

या पॅकेजमध्ये तुम्ही थायलंडमधील पट्टाया आणि बॅंकॉकमधील विविध ठिकाणांना सहज भेट देऊ शकता. जाणून घेऊयात सविस्तर IRCTC च्या या कपल स्पेशल ट्रॅव्हल पॅकेजबद्दल माहिती.

पॅकेजचे नाव - The Treasures of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad

पॅकेजची तारीख – हे पॅकेज १४ फेब्रुवारीसाठी आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही थायलंड आणि पट्टायाला भेट देऊ शकता.

फ्लाईट कुठून मिळणार

थायलंडला जाण्यासाठी तुम्हाला हैदराबाद या शहरातून फ्लाईट पकडावी लागेल.

पॅकेजचा कालावधी ?

कपल स्पेशल या पॅकेजचा कालावधी ३ रात्री आणि ४ दिवसांचा असणार आहे.

या पॅकेजचा खर्च किती असणार ?

व्हॅलेंटाईन स्पेशल पॅकेजसाठी तुम्हाला किमान ४८ हजार ४७० रूपयांचा खर्च येईल. शिवाय, या खर्चामध्ये तुमच्या राहण्याचा, खाण्याचा आणि फ्लाईट तिकिटाचा समावेश असणार आहे.

जर तुम्ही दोघे जण (कपल्स) थायलंडला जाणार असाल तर या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या मागे ४८ हजार ४७० रूपयांचा खर्च येईल.

तुम्ही एकटे देखील थायलंडला जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ५६ हजार ८४५ रूपयांचा खर्च येईल. त्या खर्चामध्ये फ्लाईटचे तिकीट, खाण्याचा आणि राहण्याचा खर्च समाविष्ट असेल.

जर तुम्ही लहान मुलांसोबत या टूर पॅकेजला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी प्रति व्यक्ती ४८ हजार ४७० रूपयांचा खर्च येईल. यासोबत लहान मुलांसाठी बेडसहीत ४५ हजार ५७५ रूपये आणि बेडशिवाय ४१ हजार ५५० रूपये या प्रमाणे खर्च येईल.

या टूर पॅकेजच्या बुकिंगसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर तुम्हाला या पॅकेजशी निगडीत अधिक माहिती मिळू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in