Video : उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग असतात? मग वर्षभरासाठी 'असा' साठवा लिंबाचा रस, वापरा ही सोपी ट्रिक

लिंबू हा किचनमध्ये वापरला जाणारा एक महत्वाचा पदार्थ आहे. कांदे पोहे, मिसळ, पावभाजी, चिकन, मटण इत्यादींवर लिंबू पिळून खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही.
 Video : उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग असतात? मग वर्षभरासाठी 'असा' साठवा लिंबाचा रस, वापरा ही सोपी ट्रिक
PM

लिंबू हा किचनमध्ये वापरला जाणारा एक महत्वाचा पदार्थ आहे. कांदे पोहे, मिसळ, पावभाजी, चिकन, मटण इत्यादींवर लिंबू पिळून खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही. तसेच लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने लिंबू सरबताचे सेवन देखील शरीरासाठी फायदेशीर ठरते. परंतु हिवाळ्यात बाजारात अगदी स्वस्त दराने मिळणारे लिंबू उन्हाळ्यात अचानक महाग होतात. नेहमी 10 रुपयांना 4 ते 5 मग मिळणारे लिंबू उन्हाळ्यात अनेकदा प्रति मग 10 ते 15 रुपयांपर्यंत पोहोचतो यामागे मागणी आणि पुरवठा ही कारण आहेत.

लिंबू महाग होतात परंतु संपूर्ण लिंबू हे महिनाभरापेक्षा जास्त साठवून ठेवता येत नाहीत. तेव्हा लिंबाचा रस वर्षभर साठवून ठेवता येईल यासाठी काही सोप्या टिप्स सोशल मीडियावरती एका यूझरने शेअर केल्या आहेत. विभास मेजवानी या इंस्टाग्राम युझरने लिंबूचा रस वर्षभर कसा साठवून ठेवायचा याविषयी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ट्रिकनुसार बाजारातून लिंबू घेऊन आल्यावर ते सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यावेत. मग आणलेल्या सर्व लिंबांचा व्यवस्थित रस काढून घ्यावा. रसामधून बिया वेगळ्या कराव्यात आणि रस बाटलीत भरून त्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवाव्यात. तसेच उन्हाळ्यात लिंबाचा ज्यूस पिण्यासाठी तुम्ही बर्फाच्या आइस ट्रेमध्ये लिंबाचा रस भरून तो डीप फ्रिज करू शकता. लिंबाच्या रसाचे बर्फात रूपांतर झाल्यावर बर्फाचे क्यूब तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात ठेऊन पुन्हा डिपफ्रीजमध्ये ठेवा.

मग जेव्हा तुम्हाला लिंबाचा रस प्यावा असे वाटेल तेव्हा तुम्ही लिंबाच्या रसाचा एक आइस क्यूब पाण्यात टाकून त्याचे सेवन करू शकता. व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार अशा पद्धतीमुळे लिंबाचा रस वर्षभर टिकतो. तसेच लिंबाचा रस काढून झाल्यावर त्याच्या सालींचा वापर तुम्ही लोणचं बनवण्यासाठी करू शकता.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in