Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत.
आनंद घ्या 'या' जोक्सचा
> तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”
> शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.
मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.
> प्रियकर :- मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले.?
प्रेयसी :- त्यांनी मला विचारलं, पोरगं काय करतंय.?
मी बोलले, पोटात लाथा मारतंय.!!
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)