Joke of The Day: एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
Joke of The Day
Viral Jokes In MarathiFreepik

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या २ वायरांपैकी एक धर जरा..

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे….सोड आता..

Joke of The Day
Joke of The Day: पोलीस- काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?

> नवरा: आज जेवायला काय बनवतेस?

बायको: आमरस, चपाती, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचे भरीत,
आळुच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोशिंबीर, खोब-याची चटणी आणि मसाला ताक.

नवरा: चटणी भाकर वाढ पण असं मोदीसारखं गंडवू नको..

Joke of The Day
Joke of The Day: नवरा- काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती…

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in