अनावश्यक चरबी कमी करायची आहे; प्या 'ही' 2 पेय

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी चरबी कमी करण्याचे पेय (फॅट कटर) प्याल तर तुम्हाला याचा नक्की फायदा जाणवेल.
अनावश्यक चरबी कमी करायची आहे; प्या 'ही' 2 पेय

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचालीसोबत डाएट करणे खूप आवश्यक असते. डाएट काटेकोर पाळूनही वजन आटोक्यात आणणं अनेकांना अवघड जातं. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी चरबी कमी करण्याचे पेय (फॅट कटर) प्याल तर तुम्हाला याचा नक्की फायदा जाणवेल. कोरफड ज्यूसच्या प्रयोगाने हे शक्य आहे. आपल्याला माहित आहे की, कोरफड भरपूर पोषणद्रव्ये आहेत. त्यामध्ये ७५ सक्रिय जीवनसत्वे आणि खनिजे आहेत. फॅट कटर पाण्यातून घेतल्यास शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. मेटाबॉलिझम वाढल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया गतिमान होते.

चरबी कमी करण्यासाठी अशा प्रकारे फॅट कटर घरच्या घरी बनवू शकता.

२-३ टीस्पून - कोरफडचा रस

१ टीस्पून - लिंबू

१ इंच - आलं

१ टीस्पून - मध

एक ग्लास साधे पाणी घ्या. त्यात कोरफड रस, लिंबाचा रस, आले आणि मध घालून मिक्स करा. आपले चरबी कापलेले पेय तयार आहे.

१ काकडी

१ टीस्पून - आले रस

१ लिंबाचा तुकडा

१ कप - पुदीना पाने

एका काचेच्या भांड्यात पाणी भरा. नंतर त्यातील सर्व घटक एकत्र करा. मग हे पाणी फ्रिजमध्ये भरावे. एका रात्रीत पाण्यातील सर्व अर्क पाण्यात मिक्स होतील. दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवसभर पाणी पिऊ शकता

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in