थायरॉईडमध्ये काय खावे आणि काय टाळावे माहिती नाही? चला आज जाणून घेऊया सविस्तर!

कधी कधी आपले अचानक वजन वाढते किंवा कमी होते हे थायरॉईडचे प्रमुख लक्षण मानले जाते.
थायरॉईडमध्ये काय खावे आणि काय टाळावे माहिती नाही? चला आज जाणून घेऊया सविस्तर!
PM

कधी कधी आपले अचानक वजन वाढते किंवा कमी होते हे थायरॉईडचे प्रमुख लक्षण मानले जाते. थायरॉईड आता एक सामान्य आजार झाला आहे. पण याकडे दुर्लक्ष करणे महागात ही पडू शकते. थायरॉईडमुळे तणाव, झोप न येणे, चिंता या सारखे लक्षणं देखील दिसतात. थायरॉईड हा अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन, आयोडीनची कमतरता किंवा तणाव यांसह अनेक कारणांमुळे होऊ शकतो. थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

थायरॉईड म्हणजे नक्की काय?

वैद्यकीय भाषेत थायरॉईड म्हणजे हायपोथायरॉइडिझम. आपल्या घशात फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते ज्याला थायरॉईड म्हणतात. जेव्हा थायरॉक्सिन आणि ट्रायओडोथायरोनिन हे महत्त्वाचे संप्रेरक योग्यरित्या तयार होत नाहीत, तेव्हा थायरॉईड रोग होत असतो.

थायरॉईडमध्ये काय खावे-

जर तुम्हाला थायरॉईड असेल तर अंडी, नट, संपूर्ण धान्य खाऊ शकता. पण ते जास्त प्रमाणात खाऊ नये. अंड्यांमध्ये सेलेनियम असते जे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते. काजू खाल्ल्याने हार्मोनल संतुलन सुधारण्यासही मदत होते. जर एखाद्याला अशक्तपणा वाटत असेल तर त्याने संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खाव्यात.

थायरॉईडमध्ये काय खाऊ नये-

सोयाबीन किंवा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. थायरॉईडमध्ये प्रथिनांचे सेवन मर्यादित असावे. तुम्हाला हा आजार असल्यास आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी आणखी वाढू शकते. कॉफी, चॉकलेट, ब्रोकोली आणि फुलकोबी खाणे टाळले पाहिजे. या पदार्थांमध्ये थायरॉईडला उत्तेजीत करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे हा आजार वाढू शकतो.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in