नाशिक : नाशिक पश्चिम घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २० हजारांचा दंड, तर ८३ किलो प्रतिबंधक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
आयुक्त अशोक करंजकर यांचेकडून प्राप्त आदेशानुसार व संचालक घनकचरा विभाग डॉ. आवेश पलोड यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी विभागीय अधिकारी नेर व मा.विभागीय स्वच्छता निरीक्षक बागूल यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पश्चिम घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर केल्याबाबत २ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये २० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ८३ किलो प्रतिबंधक प्लास्टिक जप्त करण्यात आले. सदर कारवाई स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड, वाहनचालक तांबोळी यांच्यामार्फत करण्यात आली.