चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अगदी बघणाऱ्यांच्या मनाला देखील यामुळे अत्यंत वेदना झाल्या आहेत. घुग्घुस शहरात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब एका गायीने तोंडात घेतला. यावेळी बॉम्बचा स्फोट झाल्याने गायीचा जबडा छिन्नविछीन्न झाला. ही गाय या फाटलेल्या जबड्यासह शहरातील मार्गावर फिरताना दिसली. यामुळे अनेकजण हळहळले. यापैकी काही जणांनी प्यार फाउंडेशनला याबाबतची माहिती दिली. या फाउंडेशनने गायीवर दोन दिवस उपचार केले. मात्र, आज या गायीचा मृत्यू झाला आहे.
वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात घेतल्याने त्याचा स्फोट झाला आणि त्यात गायीचा जबडा फाटला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. गाय मालकाने देखील या घटनेनंतर गायील वाऱ्यावर सोडून दिल्याचे सांगितले जात आहे. गाय या जखमी अवस्थेत महामार्गावर फिरताना दिसली. यावेळी अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. यावेळी काहींनी प्यार फाउंडेशचे देवेंद्र रापल्ली यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी गायीला उपचारासाठी हलवले. या गायीवर दोन दिवस उपचार केले. मात्र, जखम खूप मोठी होती त्यामुळे गायीचा मृत्यू झाला आहे.