उर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा!राष्ट्रवादीच्या बैठकीत एकनाथ खडसे यांचा आरोप

बैठकीत खडसे बोलत होते. बैठकीच्याा अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील होते.
उर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा!राष्ट्रवादीच्या बैठकीत एकनाथ खडसे यांचा आरोप

जळगाव :उर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा झाला असून वैदयकीय खात्याच्या माध्यमातून सीटस वाढवण्यासाठी ५० – ५० लाख रू घेतले गेले आहेत. येत्या अधिवेशनात आपण बाबत शासनाला जाब विचारणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलतांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत खडसे बोलत होते. बैठकीच्याा अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील होते.

एकनाथ खडसे म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. यात सर्वाधिक संताप हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात आहे. फडणवीसांनी विविध समाजाला अनेक आश्वासने दिली; मात्र ती पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत देखील जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात त्यांच्या उर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा झाालेला असून, येत्या अधिवेशनात याबाबत जाब विचारणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी देखील वैदयकीय खात्याच्याा सीटस वाढवण्यासाठी ५०-५० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मी कधी हवेत आरोप करत नाही. पुरावे असल्यानंतरच आरोप करतो. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत आमदारामुळे केळी उत्पादकांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याचा आरोप केला.

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा

राज्यातील शिंदे सरकारविरोधात जनतेतप्रचंड संताप निर्माण णाला आहे. आश्वासने देउुन विविध समाजाची दिशाभूल सरकारकडून होत आहे. राज्यात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली असल्याने चांगला पर्याय म्हणून जनता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अपेक्षेने पहात आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच राहणार असल्याचे भाकीत वेळी एकनाथ खडसे यांनी या बैठकीत बोलतांना केले. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे माजी आमदार डॉ. बी. एस . पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटीलसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in