महाबळेश्वरजवळ भीषण अपघात, ३८ प्रवासी घेऊन जाणारा ट्र्क दरीत कोसळला

या अपघातात महिला आणि लहान मुलांसह अनेक कामगार जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक
File Photo
File Photo

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर मुकदेव घाटातील कोट्रोशी पुलाजवळ 38 कामगारांसह ट्रक दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह अनेक कामगार जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर टेम्पो मजुरांना कामासाठी घेऊन जात असताना मुकदेव घाटात अवघड वळणावर टेम्पो दरीत कोसळला. टेम्पोमधून 38 प्रवासी कामावर जात होते. हे समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाबळेश्वर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. सर्वांना बाहेर काढून महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व प्राथमिक उपचारानंतर सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in