पालघरजवळील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ३ ठार

पालघरजवळील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ३ ठार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबावर काळाचा घाला

पालघर जिल्ह्यातील कासाजवळ एका गाडीचा भीषण अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी झालेल्या या अपघातामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे साठी जण एकाच कुटुंबातील होते. मिळालेल्या माहितीनुसार, खड्डा चुकवण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. नालासोपारा येथे वास्तव्यास असणारे राठोड कुटुंब हे गुजरातमधील भिलाड येथे जात होते. अंदाजे दुपारी १च्या सुमारास श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुमारे १ किलोमीटर अंतरावरील खड्डा चुकवताना हा अपघात घडला. गाडी चालवत असलेले दीपक राठोड यांचा अंदाज चुकल्याने कंटेनरला मागच्या बाजूने गाडीने धडक दिली. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. ६५ वर्षीय नरोत्तम राठोड, ३२ वर्षीय केतन राठोड आणि अवघ्या १ वर्षाच्या आर्वी राठोडचा मृतांमध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in