Sangli : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील या अभिनेत्रीचा अपघाती मृत्यु

कोल्हापूर सांगली (Sangli) महामार्गावर हालोंडीजवळ डंपरच्या धडकेत झाला तरुण अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत
Sangli : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील या अभिनेत्रीचा अपघाती मृत्यु

घराघरात पोहचलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमध्ये भूमिका बजावणाऱ्या नवोदित अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव (Kalyani Kurale) यांचा अपघाती मृत्यु झाला. कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी स्टार प्रवाहवरील 'दख्खनचा राजा जोतिबा' तसेच अन्य काही मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. याशिवाय त्यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच 'प्रेमाची भाकरी' नावाचे एक हॉटेल सुरु केले होते.

कल्याणी कुरळे-जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्या महावीर कॉलेज परिसरात राहत होत्या. त्यांचे हॉटेल बंद करून बाहेर पडत असताना डंपरने धडक दिली आणि त्यांचा या अपघातात मृत्यु झाला. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in