
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याने विविध चर्चा रंगल्या. अजित पवार गटाच्या समावेशानंतर शिंदे गट नाराज असल्याचे सातत्याने बोलले जात होते. वर्षभरापूर्वी अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याने सत्तेबाहेर असल्याचे शिंदे गटाने म्हटले होते. पण अखेर शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले.
नवनियुक्त मंत्र्यांच्या खात्यांच्या वाटपासोबतच विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्या मान्यतेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खात्यांच्या वाटपाची घोषणा केली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनाही वजनदार खाती मिळाली आहेत. मात्र शिंदे गटाच्या आमदारांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे गटाच्या आमदारांची खरडपट्टी काढली.
काय आहे नेमकं ट्विट ?