
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (५ ऑगस्ट शनिवार) संघ्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. ते दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस ते पुण्यात तळ ठोकून राहणार होते. या दरम्यान त्यांनी तब्बल चार तासांची बैठक ठेवली होती. मात्र, आता शाह यांच्या या दौऱ्यात मोठा बदल झाला आहे. त्यांच्या चिंचवड येथील कार्यक्रमादरम्यात ते थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.
अमित शाह हे काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले. त्यांच्या हस्ते 'सहकार ते समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. तसंच दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. या ठिकाणी त्यांच्या काही नियोजित बैठका होणार होत्या. मात्र, आता त्यांच्या या दौऱ्यात मोठा बदल झाला असून पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांनी त्यांत्या इतर बैठका रद्द केल्या आहेत. ३ वाजता ते पुणे विमानतळावरुन थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.
अमित यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या देखील उपस्थिती असणार आहे.