Twitter/@AbdulSattar_99
Twitter/@AbdulSattar_99

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची दसरा मेळाव्यासाठी ३०० एसटी गाड्यांची मागणी

सर्व जिल्ह्यांतून मुंबईत येण्यासाठी ४ हजार १०० गाडय़ा उपलब्ध होऊ शकतात का? याबाबत आगरप्रमुखाना विचारणा

५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे. दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करण्यासाठी विविध युक्ती लढवत असताना शिंदे गटातील आमदार राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड आगार प्रमुखांकडे दसरा मेळाव्यासाठी तब्ब्ल ३०० एसटी गाडय़ा आरक्षित करण्यासाठी अर्ज केला आहे. तर सर्व जिल्ह्यांतून मुंबईत येण्यासाठी ४ हजार १०० गाडय़ा उपलब्ध होऊ शकतात का? अशी विचारणाही सत्तार यांनी केली आहे. यसोबत ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव यांसह अन्य भागांतून किती एसटी लागतील याविषयीची माहिती देखील सत्तार यांनी संबंधित आगारप्रमुखांना दिली आहे.    

उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे, तर शिदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळाव्याला शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे गटाने कंबर कसली असून मुंबईत मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांना आणण्यासाठी वाहने आरक्षित केली जात आहेत. त्यात एसटी गाडय़ांचेही समूह आरक्षण करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी सरसावले आहेत. त्यांनी चार हजारांहून अधिक एसटी गाडय़ा आरक्षित करण्यासंदर्भात विचारणा केली असल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड आगारप्रमुखांकडे दसरा मेळाव्यासाठी तब्ब्ल ३०० एसटी गाडय़ा आरक्षित करण्यासाठी अर्ज केला आहे. तर सर्व जिल्ह्यांतून मुंबईत येण्यासाठी ४ हजार १०० गाडय़ा उपलब्ध होऊ शकतात का? अशी विचारणाही सत्तार यांनी केली आहे. यामुळे एसटी महामंडळ चांगलेच अडचणीत आले आहे. मुळात पुरेशा एसटी गाडय़ा महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने सणांच्या दिवसात प्रवासी वाहतूक करायची की मागणी करण्यात आलेल्या गाड्या द्यायच्या? हा प्रश्न महामंडळाला पडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in