Ajit pawar : पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीदौऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला

चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन चढाओढ सुरु असल्याचं दिसून येत होतं.
Ajit pawar : पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार!  मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीदौऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून सतत काही ना काही कारणाने सरकारमध्ये सुरु असल्याचं दिसून आलं. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याने अजित पवार गटात नाराजी असल्याचं बोललं जात होतं. अखेर अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यात पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे.

अजित पवार काही आमदारांच्या मदतीने शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्याने अजित पवार, छगन भुजबळ, दादा भूसे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती. चंद्रकांत पाटील हे जरी पुण्याचे पालकमंत्री असले तरी अजित पवार यांचा दरारा जिल्ह्यात वाढताना दिसत होता. यामुळे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात पालकमंत्री पदावरुन चढाओढ सुरु असल्याचं दिसून येत होतं.

राज्यातील गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळलं. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार यांनी दांडी मारली. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या सुधारित पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in