Nitesh Rane : माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर...; नितेश राणेंची मतदारांना धमकी

ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर असताना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवलीत केलेल्या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
Nitesh Rane : माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर...; नितेश राणेंची मतदारांना धमकी

महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. अशामध्ये एका गावामध्ये प्रचार करत असताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वक्तव्यावर नवा वाद निर्माण झाला आहे. 'जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, मी त्या गावाचा विकास करेन. पण, जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर निधी मिळणार नाही. आता याला धमकी समाज नाहीतर काहीही समजा.' असे म्हणत त्यांनी धमकीच दिली आहे. यावरून आता पुन्हा एकदा नवा वाद सुरु होणार आहे. कारण, विरोधकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

कणकवलीत बोलताना नितेश राणे म्हणाले की, "जर याठिकाणी चुकूनही माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर त्या गावाला मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. एवढी काळजी मी घेईनच. माझा गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा. सगळा निधी आता माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्रामविकास किंवा केंद्राचा निधी असो. मी सत्तेत असणारा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत."

यावरून आता विधान चांगलेच आक्रमक झाले असून नितेश राणेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. "मतदारांना धमकी देऊन सत्तेचा माज कसा असतो हे नितेश राणेंनी दाखवून दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांचे वडील नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनाही सत्तेचा असाच माज झाला होता. पण तो सिंधुदुर्गच्या जनतेने चांगलाच उतरवला." अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in