कार्तिकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मंदिर समितीकडून आमंत्रण नाही ; 'या' कारणाने घेतला निर्णय

दोन्ही उपमुख्यमंत्री कोणालाच निमंत्रण द्यायचं नाही, असा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
कार्तिकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मंदिर समितीकडून आमंत्रण नाही ; 'या' कारणाने घेतला निर्णय

येणाऱ्या कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा कोणत्या उपमुख्यमंत्राच्या हस्ते होणार आहे. याकडे सगळयांच लक्ष लागून आहे. या पूजेला देवेंद्र फडवणीस की अजित पवार नेमका कोणाला मान द्यायचा हा प्रश्न मंदिर समितीपुढं निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी समितीने राज्याच्या विधीविभागाकडेही सल्ला मागितला होता. मात्र असं समजतंय की, या दोघांपैकी कोणालाच निमंत्रण द्यायचं नाही, असा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

मराठा आरक्षणाच्या सुरु असलेल्या तीव्र आंदोलनामुळे हा निर्णय समितीने घेतला आहे. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाने मंदिर समितीला आवाहन करत इशारा केला होता की, मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्याना पूजा करू देणार नाही. याच पार्श्वभूमीवर समितीनं हा निर्णय घेतल्याचं समजतं आहे. दरम्यान, मंदिर समितीचा निर्णय म्हणजे पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याचा प्रकार असल्याची चर्चा समाजात रंगली आहे.

मागील कार्तिक एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या हस्ते झाली होती. यावेळी दोघांपैकी कोणाला बोलवायचं हा प्रश्न मंदिर समितीपुढं होता. कोणत्याचं उपमुख्यमंत्र्यांची नाराजी समितीला यावेळी परवडणारी नव्हती. या पार्श्वभूमीवर समितीने वेगळाच मार्ग घेतल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in