संभाजी भिडेंसह १५० जणांवर गुन्हा दाखल ; परवानगी नाकारल्यानंतर देखील घेतली सभा

संभाजी भिडेंसह १५० जणांवर गुन्हा दाखल ; परवानगी नाकारल्यानंतर देखील घेतली सभा

संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांवर हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील सभेचं आयोजन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांवर हा गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी लोणीकंद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांची नगर रस्त्यावरील मांजरी लोकवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी(२ सप्टेंबर) सभा आजोजित करण्यात आली होती. संभाजी भिडे हे वारंवार वादग्रस्त विधान करत असतात, त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, असा इशारा विविध पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी दिला होता. भिडेंची सभा झाल्यास ती उधळून लावण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. लोणीकंद पोलिसांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं होतं.

या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्थचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त घटनास्थळी ठेवला होता. पोलिसांनी सभेला परवानगी दिली नसून देखील सभा घेतल्याने पोलिसांनी भिंडेंची सभा पार पडल्यानंतर रविवारी मध्यरात्री संभाजी भिडे यांच्यासह सभेचं आयोजन करण्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in