चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी होणार? पुण्याच्या पालकमंत्री पदी लवकरच अजित पवारांच्या वर्णीची शक्यता

अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देणं ही भाजपाला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण...
चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी होणार?  पुण्याच्या पालकमंत्री पदी लवकरच अजित पवारांच्या वर्णीची शक्यता
Hp
Published on

राज्यात सुरु असलेलं सत्तानाट्य काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांना दमदार खात्यांचं वाटप देखील करण्यात आलं. मात्र, शिंदे सरकारचा अजुनही सत्ता विस्तार बाकी आहे. त्यामुळे लवकरच सत्ता विस्तार होण्याचा चर्चा सुरु आहेत. तसंच काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याची देखील उचलबांगडी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त होतं आहे. अजित पवार यांचा गट नव्याने सत्तेत सहभागी झाल्याने पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये खांदेपालट होणार आहे. महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होणार?

अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजित पवार यांनी पुण्याचा पालकमंत्री करा, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यामुळे लवकर अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. असं झाल्यास पुण्याचे विद्यमान पालमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जाईल. त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना भाजपचा कसबा पोटनिवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याविषयी भाजपात नरााजी आहे.

दुसरी अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देणं ही भाजपाला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार हे शरद पवार यांच्या गटापेक्षा पुण्यात आली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना पालकमंत्री पद मिळाल्यास त्याच्या कक्षा अधिक विस्तारतील. यामुळे भाजपची ताकद कमी होईल. अशी देखील भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.

पालकमंत्री पदाच्या नव्या खांदेवाटपाविषयी धर्मराव बाबा अत्राम यांना भंडारा आणि गोंदीयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल. बीडसाठी धनंजय मुंडे, कोल्हापूरसाठी हसन मुश्रीफ आणि नाशिकसाठी छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in