उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचा झटका ; नव्या पदांच्या नियुक्ती

यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कायम राहणार आहेत
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचा झटका ; नव्या पदांच्या नियुक्ती
ANI

उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांनी आणखी एक झटका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या पदांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. कामगार पक्षाचे नेते किरण पावसकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांच्या सचिवपदी ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कायम राहणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेनेचे उपनेते तथा आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील, दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड झाली आहे. अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

किरण पावसकर आणि संजय मोरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. उर्वरित शिलेदारांनाही लवकरच देण्यात येणार आहे. या नियुक्तीमुळे पक्षाचे काम अधिक काटेकोरपणे करणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठीही हा निर्णय फायदेशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वादाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने बंडखोर शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे पाऊल उचलले असतानाच दुसरीकडे शिंदे गटाने नव्या नियुक्त्या जाहीर करून आव्हान दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in