आमदारांच्या 'या' प्रकारावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली असून त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना सुरुवातीलाच शिंदेंच्या रोषाला सामोरे जावे लागले
आमदारांच्या 'या' प्रकारावर मुख्यमंत्री शिंदे नाराज
ANI

गुरुवारी राज्यामध्ये नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली असून त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना सुरुवातीलाच शिंदेंच्या रोषाला सामोरे जावे लागले. एकनाथ शिंदे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होणार हे गुरुवारी जाहीर झाल्यावर शिंदे गटातील आमदारांनी गोव्यातील हॉटेलमध्ये जल्लोष साजरा केला. यावेळी त्यांचा नाचतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकारावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे शुक्रवारी पहाटे येथून जवळच असलेल्या डोना पॉला हॉटेलमध्ये परतले. आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले की, "अशाप्रकारे नाचणे ही चूक होती, हे आम्ही मान्य करतो. ज्या आमदारांना जनतेने निवडून दिले आहे आणि ज्यांचे ध्येय महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करणे आहे, अशा आमदारांना हे शोभत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in