पुण्यात कंटेनरची तीन वाहनांना धडक; दोघांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले
पुण्यात कंटेनरची तीन वाहनांना धडक; दोघांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील जांभुळवाडी दरी पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटनेरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

शनिवारी पहाटे ३.५६ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य राबवले. विशाल कुमार नाविक (२२), शाहनवाज झुल्फिकार मुंन्सी (३०) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून सुभाष इंदलकर, पुजा बागल, जियालाल निसार हे जखमी झाले आहेत.

नवले ब्रिजच्या आधी आणि नव्या कात्रज बोगद्याच्या पुढे असलेल्या जांभूळवाडी दरी पुलावर बेंगळुरूहून एक कंटेनर भरधाव वेगाने येत होता. या ठिकाणी तीव्र उतार असल्याने कंटेनर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने लक्झरी बस, टेम्पो व कारला जोरदार धडक दिली. यात काही वाहनांचे नुकसान झाले तर अपघातानंतर कंटेनर पूलाखाली अर्ध्यावर लटकला होता. तर एक बस रस्त्यात उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले आहे. कंटेनरमधील दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी गंभीर अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही गंभीर जखमा झाल्या असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. जवानांनी ट्रकमध्ये असलेल्या दोघांना बाहेर काढले.

“मी जोराचा आवाज ऐकल्यानंतर दरीपुलावर गेलो. लक्झरी कार, टेम्पो आणि कारचे प्रचंड नुकसान झाले होते. तत्काळ आपत्कालीन सेवा राबवण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रत्येकाला त्यातून बाहेर पडण्याचे बळ मिळो,” असे दरीपुलावर असलेल्या एका साक्षीदाराने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in