एकनाथ शिंदे यांच्याविषयी दानवेंचं मोठ विधान ; म्हणाले, "एक वर्ष संपल्याने आता..."

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रसिद्धी पत्रक काढत प्रत्येक आमदाराला किती निधी दिला, याचा हिशोब द्यायला हवा, असं देखील दानवे म्हणाले
एकनाथ शिंदे यांच्याविषयी दानवेंचं मोठ विधान ; म्हणाले, "एक वर्ष संपल्याने आता..."

राज्यात केल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार व्हाव लागेल असं देखील बोललं जातंय. अशात राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठ विधान केलं आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत गेले नसल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु असलेल्या चर्चा आणि दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे एक वर्ष मुख्यमंत्रीपदी राहायचा वायदा होता. आता एकवर्ष संपलं असल्याने आता घरी जाव लागणार आहे, असं आम्ही अधिकारी पत्रकार यांच्याकडून ऐकत आहोत, असं दानवे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेकडून याला प्रमुख भूमिका घेतली जात आहे. अजित पवार हे फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत गेलेले नाहीत. याआधीही ते उपमुख्यमंत्री अनेकदा झालेले आहेत, असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची चौकशी सुरु आहे. हसन मुश्रीफ यांना अटक होणार होती. वळले पाटील यांचं काय हे सर्वांना माहिती आहे. हे सर्व चौकश्यांमुले गेले आहेत. नाहीतर हे कधीच कारागृहात गेले असते, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रसिद्धी पत्रक काढत प्रत्येक आमदाराला किती निधी दिला, याचा हिशोब द्यायला हवा, अशी मागणी देखील दानवे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in