आजपासून विठ्ठल दर्शन २४ तास सुरू, दररोज १ लाख भाविकांना मिळणार दर्शन

१ जुलैपासून आषाढ पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन २४ तास सुरू करण्यात आले आहे
आजपासून विठ्ठल दर्शन २४ तास सुरू, दररोज १ लाख भाविकांना मिळणार दर्शन

सोलापूर - आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल- रखुमाईचे दर्शन मिळावे, यासाठी १ जुलैपासून आषाढ पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन २४ तास सुरू करण्यात आले आहे. दररोज १ लाखांहून अधिक भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची उभारणी केली आहे.

दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येथील अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम पूर्ण केले आहे. आषाढीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे, यासाठी यात्रा काळात पंधरा दिवस देवाचे दर्शन २४ तास सुरू राहते. यंदा १ जुलैपासून १५ जुलैपर्यंत देवाचे दर्शन २४ तास चालू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. दर्शन रांगेत पावसाची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी चार आणि तात्पुरती ६ असे एकूण १० पत्राशेड उभे करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in