तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा- जयंत पाटील

आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली
तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा- जयंत पाटील

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

लवकरच गुजरात राज्याच्या निवडणुका आहेत. आम आदमी पक्ष तिथे निवडणूक लढवत आहे. आपण हिंदू देवांना मानतो हे सांगण्यासाठी कदाचित गणपती आणि लक्ष्मी देवीचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी त्यांनी केली असेल, असे सांगतानाच महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवर आहे त्याला जगात मान्यता आहे. आता सर्वचजण देवदेवतांचे, महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी करत आहे. यामुळे कारण नसताना वाद निर्माण होईल. त्यामुळे आता जे आहे तेच सुरू असायला हवे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in