देशाच्या अर्थसंकल्पावर काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
देशाच्या अर्थसंकल्पावर काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. यानंतर विरोधकांकडून यावर टीका करण्यात आली. मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आजचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील सर्व जनहिताय संकल्पनेवर आधारीत अर्थसंकल्प आहे." ते म्हणाले की, "गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सर्वांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे." असे म्हणत त्यांनी टीकाकारांना टोला लगावला.

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी यावेळी टीका करताना म्हंटले की, "किसान योजनेअंतर्गत ११ लाखांचे आकडे केंद्र सरकारने सांगितले होते. पण, ते आकडे खोटे आहेत. केवळ ३ लाख शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळालेला." यावरून देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले की, "हे जे बोलत आहेत, त्यांना आकडे माहित नाहीत. त्यांना एकच आकडा समजतो, आता तो कोणता हे तुम्हाला वेगळे सांगायचं गरज नाही. अशा आकडेबाज लोकांबद्दल मला विचारू नका." असे म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदारांना टोला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in