विद्यापीठ ज्ञान स्रोत केंद्रात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

प्रदर्शनात असे एकूण चौऱ्यांशी दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत
विद्यापीठ ज्ञान स्रोत केंद्रात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्ञान स्रोत केंद्रात दिवाळी अंकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. प्रदर्शनात असे एकूण चौऱ्यांशी दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमास विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी एम खंदारे, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक बच्चेवार, मानव्यविद्या विद्याशाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर, विद्यार्थ्यी विकास विभागाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, भूशास्त्र संकुलाचे संचालक तथा ज्ञान स्रोत समिती सदस्य डॉ. अविनाश कदम, भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, माध्यमशास्र संकुलाचे डॉ. राजेन्द्र गोणारकर, ललित व प्रयोगजीवी कला संकूलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. सुहास पाठक, डॉ. निना गोगटे, डॉ. झिशान अली यांचेसह प्राध्यापक, आधिकारी, कर्मचारी व संशोधक यांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in