
राज्याच्या राजकारणात आज सकाळीच एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदारांच्या अपात्रतेसह अन्य याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, या प्रकरणांची आज खंडपीठासमोर सुनावणी झाली नाही. खटल्यांच्या सुनावणीसाठी खंडपीठे स्थापन करण्यासही काही कालावधी लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 12 जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.एस. व्ही रामण्णा म्हणाले की, या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार नाही. खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायाधिकरणाची गरज भासेल. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीस वेळ लागेल, असे ते म्हणाले.