
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत आपल्या आठ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिलचं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यावर भाष्य केलं. यावेळी चहापाण्यावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच फडकेबाजी केली.
राज्यात अजूनही सर्वत्र समाधानकारर पाऊस झाल्या नसल्याने मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. शेवटी निसर्ग असून लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीठ होत आहे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगत आम्ही बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याती ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारलं. विरोधी पक्ष गोंधळलेला असून त्यांनी आत्मविश्वास गमावलेला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच विरोधी पक्ष आहे कुठे हे देखील पाहिलं पाहीजे. आम्ही तिघांनीही विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने देखील त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. विरोधकांना चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहीजे. असं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचं कौतूक करत अजितदादा सरकारमध्ये आल्यापासून विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करु. विरोधी पक्ष कितीही कमकुवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नसल्याचं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसंच त्यांनी सरकार पडणार असं म्हणू नका नाही तर आणखी काही होईल, असा टोला सरकार पडणार अशी टीका करणाऱ्यांना लगावला.