सत्ताधाऱ्यांचे लोक, कार्यकर्त्यांकडून घेतात घरं जाळून अशी शंका; जरांगे यांनी केलं शांततेचं आवाहन....

बीडबरोबर राज्यभरात मराठा आंदोलकांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही देखील घडल्या आहेत.
सत्ताधाऱ्यांचे लोक, कार्यकर्त्यांकडून घेतात घरं जाळून अशी शंका; जरांगे यांनी केलं शांततेचं आवाहन....

राज्यात मराठा आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत. उपोषण , मोर्चे , प्रचार सुरु असताना आता ठिकठिकाणी जाळपोळ देखील सुरु झाल्या आहेत. या जाळपोळीच्या घटनेवरती मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्त्यवं मांडलं आहे. मी समाजाला सांगितल होत की जिथं जिथं, साखळी उपोषण आहे तिथं तिथं आमरण उपोषण सुरु करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मी केलं होत . मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय या गोस्टची मोठी मला शंका येतं आहे. राज्यात जि जाळपोळहोत आहे ती करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीत घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.

बीडबरोबर राज्यभरात मराठा आंदोलकांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही देखील घडल्या आहेत. आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांचे बंगले आणि कार्यालय यांना देखील जाळपोळीचा सामना करावा लागला आहे . त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा बांधवाना सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.

जाळपोळ करू नका अन्यथा निर्णय घेणार

मराठा समाजान शांत रहावं असं आवाहन करताना मनोज जरांगे म्हटलं आहेत की, सर्वाना माझी हात जोडून विनंती आहे, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचं आहे. आपण कुणाच्याही दारात जाचचं नाही.असं जरांगे म्हटलं आहेत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in