ईडीचा वापर केवळ राजकीय कारणांसाठीच केला जातोय,पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारसह पीएमएलए आणि ‘ईडी’च्या कारवायाबाबत हल्लाबोल केला.
 ईडीचा वापर केवळ राजकीय कारणांसाठीच केला जातोय,पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात पीएमएलए आणि ‘ईडी’ने २९-३० छापे टाकले होते. हे छापे आतंकवादी कारवायांना पैसे पुरविणाऱ्यांच्या विरोधात होते. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता; मात्र मोदी सरकार या कायद्याचा वापर केवळ राजकीय कारणांसाठीच करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारसह पीएमएलए आणि ‘ईडी’च्या कारवायाबाबत हल्लाबोल केला.

चव्हाण म्हणाले, ‘‘मोदी सरकार ‘ईडी’चा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी करत आहे. त्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असून, लोकशाही संकटात आहे. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे; पण ती कोविडमुळे झाली असल्याचे उत्तर सरकारकडून दिले जात आहे, ही दिशाभूल आहे. यूपीए सरकारच्या काळात उच्चांकी ८ ते ९ टक्क्यांपर्यंत विकासदर होता. त्यानंतर मोदी सरकारने अनेक चुका केल्या. जानेवारी ते मार्च २०२० या काळात कोविड अगोदरची आकडेवारी ४.१ टक्के अशी होती. तोही आकडा खरा आहे की नाही, याबाबत साशंकता आहे. बेरोगजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी आहे. आंतरराष्ट्रीय कर्ज काढण्याची मर्यादा संपत आलेली आहे, याचे कारण केवळ मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थेतील गंभीर चुका हेच आहे” असा सनसनाटी आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in