फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया

इतक्या दिवसांनी खळबळ माजवून फडणवीसांना काय साध्य करायचे आहे ते पाहावे लागेल
फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंद आहे, असे संजय राऊत म्हणाले. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यात मोठा फरक असल्याचेही राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. त्यांना स्टंटबाजी आणि सनसनाटी निर्माण करण्याचे वेड का आहे ते मला कळत नाही. राजकारणात आपण नेहमी एकमेकांशी बोलतो. ज्या काळात महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत होत्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होत होते. अशावेळी ज्यांना सरकार बनवायचे आहे त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असावी. इतक्या दिवसांनी खळबळ माजवून फडणवीसांना काय साध्य करायचे आहे ते पाहावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in