विरोधी पक्षनेत्यांचा खोटारडेपणा उघड, राजू वाघमारेंची ठाकरे व वडेट्टीवार यांच्यावर टीका

महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे सैरभैर झालेल्या विरोधी पक्षनेत्यांचा खोटारडेपणा उघड झाल्याची टीका शिवसेना मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली
विरोधी पक्षनेत्यांचा खोटारडेपणा उघड, राजू वाघमारेंची ठाकरे व वडेट्टीवार यांच्यावर टीका
Published on

मुंबई : महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे सैरभैर झालेल्या विरोधी पक्षनेत्यांचा खोटारडेपणा उघड झाल्याची टीका शिवसेना मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली. वडेट्टीवारांनी केलेले आरोप खोटे असून, माधुरी कल्याण नष्टे आणि अजय कल्याण नष्टे या बहीण-भाऊ उमेदवारांनी ओबीसी प्रवर्गातून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून, दिव्यांग आरक्षणातून नाहीत, असे डॉ. राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले.

माधुरी नष्टे आणि अजय नष्टे यांनी खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे एमपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला होता. माधुरी नष्टे या २०१४ बँचच्या अधिकारी असून, भाऊ अजय नष्टे २०१७ बँच अधिकारी आहेत. बहीण आणि भाऊ हे दोघेही उमेदवार एमपीएससीमध्ये ओबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण झालेले आहेत.

राज्यावर साडेसात लाख कोटींचे कर्ज हे 'जीडीपी'च्या केवळ १८.३८ टक्के इतके आहे. राज्य सरकारला 'जीडीपी'च्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. पुरवणी मागण्यांचा विचार केला, तरी राज्याचे कर्जाचे प्रमाण २०.५० टक्क्यांपर्यंत गेले आहे. सरकारवर कर्जाचा काहीही परिणाम होत नाही, तसेच कर्ज घेऊन सरकार सर्व सामान्यांच्याच विकासासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे योजनांच्या पूर्ततेसाठी सरकारकडे पैसे नाही, हे खोटे नरेटिव्ह विरोधक पसरवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in