शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

वाशिम : सुरळीत विद्युत पूरवठ्याची मागणी करीत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा या पिकाची पेरणी केली. या पिकांना पाण्याची गरज असताना विज वितरण कंपनी पुरेसा विद्युत पूरवठा करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान वीज वितरणच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in