
नांदेड : कर्जाच्या तणावातून गळफास घेवुन एका शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बोंढार हवेली येथे २२ ऑगस्ट रोजी घडली.सुरेश शामराव तिडके (४५) असे मृताचे नाव आहे. बोंढार तर्फे हवेली (ता. जि. नांदेड) येथे, शेतकरी सुरेश शामराव तिडके यांनी घेतलेल्या कर्जाच्या तणावातुन कंटाळुन २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान, घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छताच्या लोखंडी हुकास उपरण्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. याप्रकरणी विजय सुरेश तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.