Pune : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर...
Pune : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल
Pune : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखलसंग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कादगपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.

पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावले असता त्यांनी शंतनू कुकडेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे काही कागदपत्र सादर केली होती. परंतु ही सादर केलेली कागदपत्राची पोलिसांनी पडताळणी केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण काय?

पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे.

logo
marathi.freepressjournal.in